अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी अभियंत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १२ जुलै रोजी विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला असला तरी अद्यापही विवाह सोहळ्यातील काही कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी रिसेप्शन पार पडलं.

अंबानीच्या लग्नसोहळ्यात बॉम्ब फुटणार अशा पद्धतीची धमकीची पोस्ट सोशल मीडियावर केल्याप्रकरणी मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी एका अभियंत्याला अटक केली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात बॉम्बची धमकी दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आज एका ३२ वर्षीय अभियंत्याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *