माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज (शुक्रवार) वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले मोदी यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा देताना म्हटले आहे की, “डॉ.मनमोहन सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे प्रार्थना करतो‘ माजी पंतप्रधान सिंग हे आज त्यांचा 83 वा वाढदिवस साजरा करत असून 84 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी सिंग यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मनमोहन सिंग हे भारताचे चौदावे पंतप्रधान होते. तसेच त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदही भूषविले होते.

