बहुचर्चित आणि जगातील सर्वात गँण्ड वेडिंग अनंत अबांनी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह अखेर पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शुक्रवारी 12 जुलैला हा विवाह सोहळा रंगला. या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूड, राजकीय नेत्यांपासून खेळ जगतसह जगताली मान्यवर उपस्थितीत होते.
या लग्नाचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवरदेव अनंत अंबानी शेरवानी आणि फेट्यामध्ये उठून दिसत होता. तर नववधू राधिकाचा लूक आणि तिची एन्ट्री अतिशय सुंदर होती. वडील मुकेश अंबानी आणि काका अनिल अंबानीसह वर अनंत अंबानीने लग्न मंडपात एन्ट्री घेतली. त्यावेळी बाजूला उभे असलेले उद्धव ठाकरेंना अनंत अंबानी जाऊन भेटले. तर राधिका मर्चंट हिची एन्ट्री खूप आकर्षिक आणि लक्षवेधी होती. मोराच्या आकाराच्या बोटीतून नववधू लग्न मंडपात आली. यावेळी गायिका श्रेया श्रेया घोषाल हिने खास गाण म्हटलं. दरम्यान सोनू निगम, हरिहरन, श्रेया घोषाल आणि शंकर महादेवन यांनी लग्नाच्या विधीदरम्यान गाणी गायली, तर अजय-अतुल यांनी संगीताच्या सहाय्याने लग्नगाठ बांधण्यात आली. राधिका तिच्या पती अनंतला वचन देते म्हणाली, ‘आपले घर फक्त एक जागा नसून ती आपल्यातील प्रेमाची आणि एकत्रतेची भावना असेल आणि आपण जिथे आहोत तिथं आपल घर असेल.’

