शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; भाजपला दूर ठेवण्याची दक्षता!

काँग्रेस विचारधारेतील कणखर नेते, दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त येत्या शनिवार-रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांतून भाजपाचे नाव आणि या पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे वगळण्याची समयसूचक ‘दक्ष’ता या पक्षाचे नेते खासदार अशोक चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे.

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्तेत राहिलेले चव्हाण कुटुंब सहा महिन्यांपूर्वी अचानक भाजपावासी झाले. त्यानंतर या पक्षाने अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करून लोकसभा निवडणुकीपूर्वी नांदेड मतदारसंघ सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. पण चव्हाणांचा हा राजकीय निर्णय शंकररावांना मानणाऱ्या जिल्ह्यातील विशेषत: भोकर मतदारसंघातील काँग्रेसी मतदारांना रूचला नाही. परिणामी निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपा उमेदवाराचा दारुण पराभव झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *