‘तू पळून जा, अपघात चालकाने केल्याचे सांगू’; वरळी अपघातानंतर शिवसेना उपनेते राजेश शहांचा मुलाला सल्ला

शिवसेना उपनेते राजेश शहाने मुलगा मिहिरला अपघातानंतर चालक गाडी चालवत असल्याचे सांगू, तू पळून जा, असा सल्ला दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. वरळी येथे कावेरी नाखवा यांना गाडीने धडक दिल्यानंतर आरोपी मिहिर याने त्याचे वडील राजेश शहा यांना दूरध्वनी केला होता. त्यावेळी, शहा यांनी मिहिर याला पळून जाण्यास सांगितले. तसेच, हा अपघात चालक राजऋषी बिडावत याने केल्याचे सांगू, असे सांगितल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राजेश शहा यांना न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दुसरा आरोपी राजऋषी बिडावत याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. राजऋषी हा शहा कुटुंबीयांचा चालक असून अपघातावेळी मिहिरच्या शेजारी गाडीमध्ये बसला होता.

वरळी येथील अपघातानंतर पोलिसांनी उपनेते राजेश शहा यांना रविवारी अटक केली होती. शहा यांच्यावर मुख्य आरोपी असलेला मुलगा मिहिर शहा याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *