अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरी झालेल्या चोरीचा शोध, साडेतेरा लाखांचे दागिने जप्त

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरी झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास सातारा पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून पोलिसांनी तीन गुन्हे उघड करुन १३ लाख ३१ हजारांचे १८ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले . अभिनेत्रीच्या घरी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना तपास करण्याचे आदेश दिले होते.

अभिनेत्रीच्या घरातील खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले सुमारे ३ लाख ८२ हजारांचे दागिने लांबविले होते. याप्रकरणी पोलीस अभिलेखावरील राजकुमार उर्फ राजु ओंकारप्पा आपचे ( कोथळी ता. उमरगा, धाराशिव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सातारा, भुईंज, लोणंद हे तीन घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितल्याने त्याच्याकडून १३ लाख ३१ हजारांचे दागिने व दुचाकी जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे व उपनिरीक्षक अमित पाटील यांनी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *