टाटा ग्रुप हा देशभरात विश्वासआर्हतेसाठी ओळखला जातो. याचीच प्रचिती काही दिवसांपुर्वी आली. टाटा इंस्टिट्यूट ऑफ सो शल सायन्सेस (TISS) मधून कर्मचारी कपात झाल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान टाटा ग्रुपचे सर्व्हेसर्वा रतन टाटा यांनी यात मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवल्या. दरम्यान टीस अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
लीग ऑफिसर पदाची भरती केली जाणार आहे. देशभरातील टीसच्या मुंबई, हैदराबाग, गुवाहटी आणि तुळजापूर 4 कॅम्पसमध्ये ही भरती होईल. त्यातील मुंबईतील मुख्य कॅम्पसचाही समावेश आहे. येथे लॉ ऑफिसरच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक अर्हता
लीगल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून कायद्याची पदवी पूर्ण केलेली असावी. यावेळी उमेदवाराला 55 टक्क्यांहून अधिक गुण असावेत. तसेच लिगल ऑफिसर पदाचा किमान 3 वर्षे कामाचा किमान अनुभव असावा. उमेदवाराला मायक्रोसॉफ्ट ऑफिसची चांगली माहिती असावी. त्याचे संवाद कौशल्य चांगले असाव
अर्ज शुल्क
अर्ज भरतावेळी उमेदवारांना 500 रुपये इतके शुल्क भरावे लागेल.
पगार
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 75 हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
कसा कराल अर्ज?
लीगल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरतीसंदर्भातील लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर मागितलेली माहिती भरा. अर्ज शुल्क भरा. निवड झालेल्या उमेदवाराने 15 दिवसांच्या आत नोकरीवर रुजू होणे आवश्यक राहणार आहे, याची नोंद घ्या
