राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

मोसमी पावसासाठी पोषक वातावरण आहे. पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होईल. जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील एल-निनो तटस्थ अवस्थेत गेला आहे, तर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत ला – निना स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. तर हिंदी महासागरातील द्वि धुव्रिता सध्या तटस्थ आहे. मोसमी पावसासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. जुलै महिन्यात देशात सरासरी २८०.४ तर राज्यात सरासरी ३६२.३ मिमी पाऊस पडतो, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *