चिपळूणच्या रस्त्यावर आली महाकाय मगर, नागरिकांची उडाली भीतीने गाळण

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातल्या मगरींच्या मुक्त वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण चिपळूण शहरातल्या चिंचनाका परिसरात महाकाय मगर नागरी वस्तीत दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. रविवारी रात्री महाकाय मगर रस्त्यावर दिसून आल्याने प्रत्यक्षदर्शींचा थरकाप उडाल. प्रशासनाने मगरीला नदीपात्रात सोडावं तसंच त्या बाहेर येऊ नये यासाठी कार्यवाही करावी ही मागणी होते आहे.

शिव नदीच्या पात्रात मगरींचा वावर

चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरींचा प्रचंड वावर आहे. चिपळूणमधल्या चिंचनाका भागात मगर रस्त्यावर आढळून आली त्यामुळे खळबळ उडाली. शिव नदीच्या पात्रात मगरींचा प्रचंड वावर, पावसाळ्यात या मगरी शहरात मानवी वस्तींमध्ये वावरताना दिसून येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *