मुंबईत पीएचडीधारकाचा मैत्रिणीच्या घरी संशयास्पद मृत्यू; पंख्याला लटकलेल्या मृतदेहावर रक्तस्राव कसा झाला?

मुंबईतील गोरेगाव येथे एका ४९ वर्षीय पीएचडी धारकाचा मृत्यू झाला आहे. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. रवी यादव असे मृताचे नाव अून ते मुळचे डोंबिवलीचे आहेत. ते एका बहुराष्ट्रीय औषध कंपनीत कामाला होते. त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर सोसायटी, म्हाडा कॉलनी येथे २४ जून रोजी यादव यांचा मृतदेह त्यांच्या मैत्रिणीच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो या मैत्रिणीबरोबर कधीतरी राहत असे. तिने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तो नेहमीप्रमाणे राहण्यासाठी तिच्या फ्लॅटवर आला. रात्री ११ वाजेपर्यंत ती दुसऱ्या खोलीत होती. नंतर हॉलमध्ये प्रवेश केल्यावर तिला यादव ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *