महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे असंघटित कामगार विभागाचे (मुंबई) विकास आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधीच पत्र काढलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बदलीसंदर्भातील अधिकृत पत्रात सांगण्यात आलं आहे की, शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार, भाप्रसे यांच्याकडून सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारावा.
