सोलापुरात वेगवेगळ्या भागातील बाजारपेठांमध्ये सराफी दुकानांमध्ये हातचलाखीने सोने-चांदीचे दागिने लांबविणाऱ्या चार बुरखाधारी महिलांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यात एका वृद्धेसह चारही महिलांनी गेल्या महिनाभरात वेगवेगळ्या सात सराफी दुकानांमधून दागिने चोरून नेले होते.
गौराबाई जाधव (वय ७५), संगीता जाधव (वय ४५), मंजुश्री जाधव (वय ४०) आणि राणी गायकवाड (वय ३५, सर्व रा. रामवाडी, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख ९५ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे चोरलेले दागिने तसेच तीन बुरखे हस्तगत करण्यात आले आहेत.
