मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या सौदी अरेबियातील मक्का शहरात हज यात्रे दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेत ३१० यात्रेकरु ठार झाले असून, ४५० जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सौदी अरेबियातील मिना इथे हज यात्रेमध्ये या वर्षी जगभरातून २० लाख यात्रेकरू आले होते. त्यापैकी दिडलाख यात्रेकरू हे भारतीय आहेत. या यात्रेमध्ये सैतानाला दगड मारण्याची प्रथा असते. या प्रथेदरम्यान ही दुर्घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी मक्का शहरातील मुख्य मशिदीमध्ये क्रेन कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या भीषण अपघातात १०७ जण ठार तर, २३८ जण जखमी झाले होते.

