इंडिकेटर यंत्रणेतील गोंधळामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला लोकलमधून पडली

डोंबिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची चुकीची माहिती डोंबिवली रेल्वे स्थानकातील दर्शक फलकावर (इंडिकेटर) देण्यात येत होती. या चुकीमुळे प्रवाशांचा गोंधळ उडत होता. या गोंधळात एक महिला प्रवासी लोकलमध्ये घाईने चढून पुन्हा उतरताना फलाटावर पडली.

सुदैवाने लोकल कल्याणच्या दिशेने फलाटवरून संथगतीने निघाली होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ भागात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शोभना साठे असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी या गोंधळाबद्दल मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. शोभना साठे या डोंबिवली रेल्वे स्थानकातून शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा येथे लोकलने चालल्या होत्या. त्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ए वर उभ्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *