पोलीस कॉन्स्टेबल असलेले उदय कृष्ण रेड्डी यांनी युपीएससीच्या सिविल सर्विसेस परीक्षा 2023 क्रॅक करुन मोठं यश संपादन केलंय. त्यांच्या जीवनातील हे सर्वात मोठे यशच नाही तर अपमानाचा खूप मोठा बदला त्यांनी घेतला आहेय उदय कृष्ण रेड्डी यांचा पोलीस विभागातील एका सिनिअर अधिकाऱ्याने अपमान केला. या अपमानानंतर त्यांनी पोलिसातील नोकरी सोडून दिली. एवढंच नव्हे तर त्यानंतर सर्वात मोठा अधिकारी होण्याचा निश्चय केला. ज्याचा बदला त्यांनी तब्बल 6 वर्षांनी घेतला.
कुणी केला होता अपमान
साल 2013 ते 2018 पर्यंत उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेशात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. असं सांगितलं जातं की, 2018 मध्ये सर्कल इंस्पेक्टर CI ने जवळपास 60 पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उदय यांचा अपमान केला. तात्काळ या अपमानाचा बदला घेत उदय यांनी राजीनामा दिला.
