भरत नवतुरे यांचा या घटनेत मृत्यू झाला. भरत आणि त्यांचा पुतण्या गोकुळदास हे एकत्रच वाशिंद येथे राहत होते. शिवाय दोघेही काळाचौकी येथील मोहम्मद हातिम दुधवाला यांच्या मोहम्मद टुर्स अँन्ड ट्रँव्हल्स या ट्रान्सपोर्टमध्ये काम करत होते. दोघेही स्कूलबस चालवतात. शिवडी येथील पालिकेच्या वाहनतळावर कंपनीच्या गाड्या पार्क केलेल्या होत्या. १५ तारखेच्या सकाळी गोकुळदास बस सुरू करून पुढे नेत असताना मागच्या चाकाखाली भरत आले. हे कळताच त्याने बस मागे घेऊन भरत यांना बाजूला काढले. मात्र यात भरत यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ परळ येतील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असताना भरत यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी भरत यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी गोकुळदास याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
