दुबईत पावसाने हाहाकार! गुडघाभर पाण्यातून विमानांचं टेकऑफ

 संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमधील सर्वात स्मार्ट शहर असलेल्या दुबईची जगभरामध्ये तेथील श्रीमंतीसाठी चर्चा असते. जगभरातील अब्जाधिशांनी केलेली गुंतवणूक आणि येथील आलिशान घरांबरोबरच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरावर सध्या एक मोठं नैसर्गिक संकट ओढावलं आहे. युएईमध्ये मागील 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. येथे पावसाने हाहाकार माजवला आहे. या शहरातील भव्यता, चकाचक इमारती, मोठे रस्ते सारं काही जलयम झालं आहे. येथील मॉलपासून विमानतळांपर्यंत सर्वच ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी भारलं आहे.

विमानतळावर घोषणा

दुबई विमानतळाच्या रन-वेवर जवळपास गुडघाभर पाणी साचलं असून या पाण्यामधूनच काही उड्डाणं करण्यात आली. मात्र पाण्याची पातळी अधिक वाढल्याने जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेलं दुबई विमानतळ उड्डाणांसाठी बंद करण्यात आलं आहे. दुबई विमानतळाबरोबरच दुबईतील धक्कादायक परिस्थिती दाखवणारे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. विमानतळांवरील परिस्थिती सामान्य होईपर्यंत आणि पाण्याचा निचरा होईपर्यंत उड्डाणे डायव्हर्ट करण्यात आल्याच्या घोषणा विमानतळावर केल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *