नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार जवळील जाबरपाडा येथे रहाणारा रुद्र पिलाना ( दीड वर्ष) हा चिमुकला घरातील पणायच्या टब मध्ये बुडून मरण पावला. खेळत खेळता तो पाण्याच्या टॅब मध्ये गेला होता. बऱ्याच वेळाने त्याच्या कुटुंबीयांना याबाबत समजले. बेशुद्धावस्थेत असलेल्या रुद्रला सुरुवातीला पेल्हार येथील गॅलेक्सी या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर अधिक तपासासाठी त्याला पालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आम्ही अधिक तपास करत असून सध्या आम्ही अपमृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

तिसरी घटना काशिमिरा जवळील घोडबंदर येथील तलावात घडली आहे. या परिसरात राहणारा इरफान पाशा (३१) याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.