चिखली, कुदळवाडीतील भंगार मालाच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली होती. अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले असून कुलिंगचे काम सुरू आहे.
चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार मालाची गोदामे आहेत. मध्यरात्री एक वाजून ३८ मिनिटांनी अनेक गोदामाला आग लागल्याची माहिती अग्निशमक दलास मिळाली. आगीचे स्वरूप पाहता महापालिकेच्या सर्व उपकेंद्रातील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. पुणे,पीएमआरडीए, एमआयडीसीचेही बंब मागविण्यात आले होते. खासगी कंपन्यातील अग्निशामक दलाचीही मदत घेण्यात आलेली आहे. ही आग आटोक्यात आली असून सद्यस्थितीत कुलिंगचे काम सुरू असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.
