बुधवारी ४ एप्रिल रोजी तैवानमध्ये भूकंपाचे धक्के बसले. तैवानच्या पूर्व किनार्याला आलेला हा भूकंप ७.४ तीव्रतेचा होता.काही स्थानिक वृत्तमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २५ वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप होता. त्यामुळे अर्थातच या भूकंपामुळे खूप नुकसान झालं. काही ठिकाणी तर इमारती देखील कोसळल्या. याच पार्श्वभूमीवर एक कौतुकास्पद व्हिडीओ समोर आला आहे. भूकंपामुळे काही लहान बाळांचा जीव धोक्यात होता. पण हॉस्पिटलमधील ३ नर्सनं मिळून या १५ बाळांचे प्राण वाचवले. लक्षवेधी बाब म्हणजे ही बाळं अवघ्या काही दिवसांची असतील, पण त्यांनी प्रसंगावधान दाखवत सर्वांचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना हॉस्पिटलच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. अन् आता हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
