एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

एप्रिल महिन्यातील ताप्त्या उन्हात सूर्यास्तानंतर अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल राहणार आहे. याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि सर्वात लहान बुध ग्रह पश्चिमेस सूर्यास्तानंतर काही वेळाने सज्ज असतील. पहाटेच्या गारव्यात मंगळ, शनी आणि शूक्र सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजाची शोभा वाढवताना दिसतील. जगातील सर्वात महागडे आंतरराष्ट्रीय अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र रात्रीच्या प्रारंभी सलग चार दिवस चमकदार स्वरूपात बहुसंख्य लोकांना सहज आणि नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. अक्षवृत्तीय तथा रेखावृत्तीय स्थितीनुसार काहीसा वेळ, दिशा आणि तेजस्वीतेत बदल घडून येईल. महाराष्ट्रभर हा अनोखा आकाश नजारा बघता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *