आज सकाळी साडेपाचच्या सुमारास नवी मुंबईतील पाम बीचवर सानपाडा सिग्नलवर होंडा सिटी आणि रिक्षाच्या अपघातात एक व्यक्ती मयत झाला आहे. अपघात झाल्यावर होंडा सिटीचा गाडी चालक पळून गेला आहे. या बाबत सानपाडा पोलीस ठाणे कारवाई करत आहेत.
पाम बीचवरून बेलापूरकडून वाशीच्या दिशेने एक रिक्षा आणि होंडा सिटी गाडी येत होती. पहाटे पाच साडेपाचची वेळ असल्याने रस्त्यावर तुरळक गाड्या होत्या. त्यामुळे गाड्या सुसाट वेगाने हाकल्या जात होत्या. त्यात सानपाडा मोराज सिग्नल ओलांडताच होंडा सिटी गाडीने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षा उडून पडली आणि त्यातील एका प्रवाशाला प्राण गमवावे लागले. तर रिक्षा चालक गंभीर जखमी आहे. अपघात झाल्यावर होंडा सिटी चालक पळून गेला आहे, अशी माहिती सानपाडा पोलिसांनी दिली.
