मुंबईतील वाहतूक कोंडीला (Mumbai Traffic) शह देत प्रवाशांना अपेक्षित वेळात अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं किंव किमान त्या ठिकाणाच्या जवळ नेण्याचं काम Mumbai Local अर्थात शहरातील रेल्वेसेवा करत असते. दर दिवशी मुंबईतील या लोकल ट्रेननं लाखो प्रवासी प्रवास करतात. तिन्ही प्रहरांमध्ये धावणाऱ्या या लोकलला आठवड्याच्या शेवटी मात्र काही महत्त्वाच्या कामांसाठी तुकड्या तुकड्यांमध्ये ब्रेक लागतो आणि ही सुस्साट धावणारी लोकल धीम्या गतीवर येते किंवा पूर्णपणे थांबते. आठवड्यातील तोच दिवस आता तोंडावर आला असून, यावेळी पश्चिम रेल्वेची सेवा खंडित होणार आहे.
जम्बो ब्लॉक…
पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) मिळालेल्या माहितीनुसार सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभाल यांसह ओव्हरहेड वायरसरह इतर काही तांत्रिक कामांसाठी रविवार 31 मार्च 2024 रोजी पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा खंडित राहणार आहे. या दिवशी चर्चगेट (Churchgate) आणि मुंबई सेंट्रल (Mumbai Central) या स्थानकांदरम्यान सकाळी 10 वाजून 35 मिनिटं आणि दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत अप, डाऊन जलद मार्गांवर तब्बल 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
