मुंबई ते पुणे हे अंतर मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे अर्थात द्रुतगती मार्गामुळं मोठ्या फरकानं कमी झालं आहे. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख असणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू (MTHL) मुळं मुख्य मुंबई शहर आणि नवी मुंबईतील प्रवासाची वेळ कमी झाली आणि परिणामी शहरातून पुढं प्रवास करु पाहणाऱ्या, पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्यांनाही याचा थेट फायदा होताना दिसत आहे. किंबहुना येत्या काळात पुण्यापर्यंतचा प्रवास आणखी कमी वेळात शक्य होणार असून त्यादृष्टीनं अटल सेतूच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या बांधकामालाही मंजुरी मिळाली आहे.
