पत्नीने पोटगीत 8745 कोटी मागितलेल्या उद्योजकाने वडिलांबरोबरचा वाद संपवला; फोटो शेअर करत म्हणाला..

एकेकाळी कापड व्यापारामध्ये आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रेमंड लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या वडिलांबरोबरचा वाद मिटवला आहे. मागील अनेक वर्षांपासून पिता-पुत्रांमध्ये वाद होता. पण बुधवारी गौतम सिंघानिया यांनी वडील विजयपथ यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत हा वाद संपुष्टात आल्याचे संकेत दिले आहे.

काय म्हटलं आहे गौतम सिंघानियांनी?

गौतम सिंघानियांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोमध्ये गौतम सिंघानिया आणि विजयपथ सिंघानिया एकमेकांच्या बाजूला उभे असल्याचं दिसत आहे. “माझे वडील आज घरी आल्याने फार आनंद होत आहे. आज मी त्यांचा अशिर्वाद घेतला. तुम्हाला कायमच चांगले आरोग्य लाभो,” अशी कॅप्शन गौतम सिंघानियांनी या फोटोला दिली आहे.

गौतम सिंघानिया सध्या त्यांच्या घटस्फोट प्रकरणामुळे चर्चेत आहेत. नवाझ मोदीपासून घटस्फोट हवा असल्याच्या खटल्यामध्ये नवाझ यांनी गौतम यांच्या संपत्तीमधील 75 टक्के वाटा पोटगी म्हणून मागितला आहे. आपली आर्थिक चणचण होऊ नये आणि निहारिका, निशा या दोन्ही मुलींचा संभाळ करता यावा यासाठी एवढी रक्कम आपल्याला हवी आहे, असा युक्तीवाद नवाझ यांनी केला आहे. गौतम सिंघानिया हे सध्या रेमंडचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. गौतम यांनी 13 नोव्हेंबर 2023 रोजी पत्नीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली. दोघांनीही लग्नाच्या 32 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 11 हजार कोटींच्या संपत्तीपैकी 75 टक्के संपत्ती म्हणजेच 8745 कोटी रुपयांची मागणी नवाज यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *