‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर..’; पोलीस स्टेशनमध्येच हवालदाराकडून महिलेबरोबर गैरवर्तवणूक! नोकरी गमावली

वाहनचोरीची तक्रारीसंदर्भात पोलीस स्टेशनला गेलेल्या मुस्लीम महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने चुकीची वागणूक दिल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे. पोलीस स्टेशनमधील मुख्य हवालदारावर महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात नाही. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी या बुरख्यातील तक्रादार महिलेला, ‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर चेहरा दिसत नाहीये,’ असं म्हणाला.

पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई

वाहन चोरीला गेल्याने त्यासंदर्भातील तक्रार केल्यानंतर त्यासंदर्भातील तपासाची चौकशी करण्यासाठी ही महिला पोलीस स्टेशनला गेली होती. त्यावेळी तिच्याशी बोलताना पोलीस हवालदाराने एक वाग्रस्त विधान केलं. या प्रकरणाची चांगलीच चर्चा चेन्नई शहरात झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. समोर आलेल्या माहितीनुसार, चेन्नई पोलिसांच्या दलातील सदर पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *