पिंपरी : किरकोळ कारणावरुन मित्राची हत्या, आरोपीला अटक

पिंपरी – चिंचवडच्या बिजलीनगर येथे मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. कमल किशोर भट आरोपी मित्राचे नाव असून त्याने प्रकाश मेहत्रे नावाच्या मित्राची हत्या केली. याप्रकरणी कमल किशोर भटला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्यानेच कमल किशोर भटने प्रकाश मेहत्रेच्या मांडीत चाकू भोसकून हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल किशोर भट आणि हत्या झालेला प्रकाश मेहत्रे दोघेही मित्र आहेत. कमल किशोर भट यांच्यावर आर्म एक्टसह इतर किरकोळ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही मित्र मद्यपान करत असत. गेल्या पंधरा दिवसांपासून मयत प्रकाश मेहत्रे हा घरी गेला नव्हता. कमल किशोर भट हा बेघर आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी बिजलीनगर या ठिकाणी एकत्र जेवण केल्यानंतर त्यांच्या किरकोळ वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली, यातूनच कमल किशोर भटने चाकूने प्रकाश मेहेत्रेच्या मांडीवर वार केले. यात गंभीर जखमी होऊन प्रकाश मेहेत्रेचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी कमल किशोर भटला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *