बापाचा पोटच्या लेकीवर वारंवार बलात्कार; 14 वर्षांची मुलगी 7 महिन्यांची गर्भवती

बाप-मुलीचे नाते हे सगळ्यात सुंदर नाते असते. वडील आपल्या मुलीला जीवापाड जपतात. मात्र, बीडच्या एका घटनेने या नात्यालाच कलंक लावला आहे. बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. नराधन बापाने पोटच्याच मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

40 वर्षीय नराधम दारुड्या बापाने पोटच्याच मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर  हा सर्व प्रकार आल्याने एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन बापाला अटक केले आहे.

बीडच्या धारूर तालुक्यातील  एका गावातील ही घटना आहे. नराधम बाप हा ऊसतोड मजूर असून 40 वर्षीय आरोपीला दारुचे व्यसन आहे. दारु पोटात गेल्यावर त्याच्यातीव हैवान जागा होत असे. त्याने आपल्या 14 वर्षांच्या मुलीवर नशेत वारंवार अत्याचार केला. मुलीच्या आईलाही इतके महिने घडत असलेल्या या घृणास्पद प्रकाराबाबत काहीच माहिती नव्हती.

एकेदिवशी अचानक पीडितेच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिची आई तिला अंबाजोगाईच्या रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेली. तिथे तपासणी झाल्यानंतर जे समोर आलं तर पाहून तिच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. पीडित तरुणीही 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. मुलीची झालेली अवस्था ऐकून आई हादरलीच.

आईने पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपल्या बापानेच अत्याचार केल्याचे सांगितले. दरम्यान, आई पीडितेच्या बाजूने उभी राहिली आणि तिने पतीविरोधात लढायचे ठरवले. पीडितेच्या फिर्यादीवरून धारूर पोलिस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक चौकशी करत नराधम बापाला अटक केली आहे. पण या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

कांदिवली पूर्व समता नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 4 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शाळेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलीस तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *