नागपुरात विधवा महिलेवर टॅक्सी चालकाचा बलात्कार

दोन मुलांची आई असलेल्या विधवा महिलेवर एका टॅक्सीचालकाने बलात्कार केला. तिला जाळ्यात ओढून दोन वर्षे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी पीडित ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवित आरोपीला अटक केली. सचिन महादेव येवले (३७) रा. यशोधरानगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सचिन विविध संस्थांमध्ये त्याचे वाहन भाड्याने लावतो. सहा वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले. महिला खासगी संस्थेत काम करून स्वत:चा आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करते.

जुलै २०२१ मध्ये महिलेची फेसबूकवर सचिनशी ओळख झाली. सचिनने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. महिलेशी लग्न आणि तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन दिले. या दरम्यान विविध हॉटेलमध्ये नेऊन महिलेचे लैंगिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी महिलेने लग्नासाठी दबाव टाकला असता तो शिवीगाळ करून धमकावू लागला आणि लग्न करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. महिलेने पेालिसांत तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सचिनला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *