निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही म्हणून डॉक्टरांनी संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांचा संप मोडून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली होती. पण ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाण्याबाबत ठाम आहेत. बुधवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. मात्र आपत्कालीन सेवा संपादरम्यानही सुरु राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
