महाराष्ट्रात सध्या उभ्या असलेल्या सर्वांग सुंदर व देखण्या मंदिरापैकी एक – खिद्रापूर कोपेश्वर मंदिर

महाराष्ट्रात सध्या उभ्या असलेल्या सर्वांग सुंदर व देखण्या मंदिरापैकी एक – खिद्रापूर कोपेश्वर मंदिर

खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर महाराष्ट्रात सध्या उभ्या असलेल्या सर्वांग सुंदर व देखण्या मंदिरापैकी एक आहे. या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. नाना विविध देव देवतांच्या प्रतिमा आहेत. रामायण, महाभारत आणि पुराण यांच्यातील प्रसंग चांगलेच बोलके आहेत.
खिद्रापूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात आहे. हे देखणे मंदिर 1927 पर्यंत जवळपास अज्ञातच होते. या मंदिरात गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि मूख मंडप यांनी युक्त आहे. मूख मंडपाला स्वर्ग मंडप असेही म्हणतात. या मंदिराच्या आतल्या आणि बाहेरील भिंतीवर 12 शिलालेख आहेत. या शिलालेखाची भाषा संस्कृत असून देवनागरी लिपीत आहे. या कोपेश्वर मंदिराबाबत खूप सार्‍या दंतकथा पण प्रचलित आहेत. चालुक्य सम्राट तृतीय पुलकेशीने इसवी सनाच्या सातव्या शतकात हे ‘कोपेश्वर’ मंदिर बांधले आहे. खिद्रापूरचे प्राचीन नाव “कोप्पत किंवा कोप्पम” असे होते. या वरून कदाचति ‘कोपेश्वर’ नाव पडले असावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *