तक्रारदार तीन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात सामील असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर अपलोड करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीला गुन्हे शाखेने अटक केली. तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधीत कंपनीतून तक्रारदाराच्या खात्यावर रक्कम प्राप्त झाल्याचे या पोस्टमध्ये म्हटले होते.
गुन्हे गुप्तवार्ता कक्षाने(सीआययू) शनिवारी याप्रकरणी अंधेरीतील रहिवासी असलेल्या मोहित दिनेश जैन याला अटक केली. त्याच्याविरोधात तोतयागिरी करणे, फसवणूक, बदनामी करणे, कट रचणे, पुरावे नष्ट करणे व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. जैन यांने ७ डिसेंबर २०२३ रोजी एक्स या समाज माध्यमामवर सत्य कर्मा नावाच्या हॅन्डलद्वारे कथीत पोस्ट केल्याचा आरोप आहे. या पोस्टमध्ये तक्रारदाराने तीन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थेकडून तक्रारदाराच्या बँक खात्यावर बेकायदेशीररित्या पैसे आल्याचे म्हटले होते. या आरोपांबाबत पुरावे म्हणून आरोपीने कागदपत्रे व काही लिंक अपलोड केले होते. पण लिंक उघडता येत नव्हत्या असे तक्रारीत म्हटले आहे.
