मनोज जरांगे पाटील २६ जानेवारी रोजी मुंबई मध्ये उपोषण करण्यासाठी येत आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. या सर्व आंदोलकांना मराठा समाज बांधवांच्यावतीने रसद पुरवली जात आहे. मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचा कस लागणार आहे. शहरातील सेवा सुविधांवर ताण तर येणारच आहे, मग अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांना पर्यंत जेवण पुरवणे हे एक आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी“ डबेवाला रोटी बॅन्क”सरसावली आहे. ज्या मराठा समाज बांधवांना आंदोलनकर्त्यांना जेवण द्यायचे असेल व त्यांच्याकडे वाहतुकीची काही सोय नसेल तर त्यांनी डबेवाला रोटी बॅन्कच्या 8424996803 या हेल्प लाईन नंबर वर संपर्क साधावा. डबेवाला रोटी बॅन्कची गाडी आपल्याकडे येईल आणि ते अन्न घेऊन आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल. वाहतुकीची समस्या लक्षात घेता ही सुविधा फक्त दक्षिण मुंबई पुरती मर्यादित राहील.
मुंबईतील डबेवाला कामगार हा मराठा आहे. आपले काम ही ईश्वर पूजा आहे, असे मानून तो मुंबईत काम करतो. आर्थिकदृष्ट्या तो गरीब आहे. पण मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत आला आहे. त्याला आपला पण मदतीचा काही हातभार, खारीचा वाटा का होईना, पण त्यात असला पाहीजे असे त्याला वाटते, अशी भावना डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी बोलून दाखवली.
प्रशासनाने सफाई मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याअंतर्गत महापालिकेच्या सर्व प्रभागात ही मोहीम राबविण्यात येत आहे. फूटपाथ स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका रस्त्याच्या कडेला असलेले विक्रेते हटवत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “जिथे कारवाई करण्यात आली आहे, हे स्टॉल तात्पुरते होते आणि ते कायदेशीर नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना कोणतीही नोटीस बजावली नाही आणि बुधवारी थेट कारवाई करण्यात आली आहे,” असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.
दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्षांनी विशिष्ट समुदाया विरुद्धच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे. “बुलडोझर संस्कृतीला विरोध केला पाहिजे कारण ती घटनात्मक नाही. बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यासाठी बुलडोझर वापरणे ही घटनात्मक पद्धत नाही. सुनावणी आणि नोटिसा बजावण्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. अशा कृती नेहमीच विशिष्ट समुदायांना का लक्ष्य केल्या जातात,” असा अतुल लोंढे यांनी केला आहे.
मीरा रोडमध्ये कारवाई
नया नगर परिसरामध्ये सोमवारी अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेलया मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर मंगळवारी संध्याकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये नया नगरमधील चार इमारतींमधील दुकानांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही नियमित कारवाई असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
