मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, ‘या’ ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडकणार आहे. त्याआधीच मुंबई पोलिसांनी  मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने  मुंबई पोलिसांना नोटीस पाठवली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुसार मुंबई पोलिसांना जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. आझाद मैदान  किंवा शिवाजी पार्क मैदानात आंदोलनासाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या नोटीशीत करण्यात आली आहे. याऐवज खारघर इथल्या मैदानात आंदोलन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यावर मराठा समाजातर्फे एडव्होकेट सतिश मानेशिंदे मुंबई पोलिसांच्या नोटीसाला कायदेशीर उत्तर देणार आहेत.

एकीकडं मुंबई पोलीस नोटीसीत आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नसल्याचे म्हणत असले तरी दुसरीकडे स्टेज बांधणीचा शुभारंभ कररण्यात आलाय. मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनासाठी हे स्टेज बांधले जातंय.

मराठ्यांचा मोर्चा जसजसा मुंबईकडे कूच करतोय तशी सरकारची धावाधाव सुरू झालीय..सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं असून मनोज जरांगेंशी चर्चा करण्यात येत आहे. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दाड हे चर्चा करत आहेत. या चर्चेतून तोडगा न निघाल्यात लोणावळ्यातून मुंबईकडे कूच करणारच असा निर्धार जरांगेंनी पुन्हा  बोलून दाखवलाय. त्य़ामुळे आता या चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिष्टमंडळ तोडगा काढण्यात अयशस्वी झालं तर जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *