इराणचा पाकिस्तानवर हवाई हल्ला, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करताना लहान मुलांचा मृत्यू

इराणने बलुचिस्तान प्रांतातील जैश उल-अदल या दहशतवादी गटाच्या दोन महत्त्वाच्या तळांवर क्षेपणास्रे आणि ड्रोनने हल्ला चढवला. या हवाई हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून दोन मुली जखमी झाले असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने, बलुचिस्तान प्रांतातील जैश उल-अदल या दहशतवादी गटाचे दोन तळ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केल्याचं वृत्त आहे.

मेहर या इराणी सरकारी वृत्तसंस्थेनुसार, कुहे सब्ज भागात जैश उल-अदलचे तळ हे दहशतवादी गटाच्या सर्वात मोठ्या तळांपैकी एक आहेत. या तळांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने नष्ट करण्यात आलं आहे. या हलल्यावरून पाकिस्तानने बुधवारी पहाटे निवेदन जारी केले. त्यानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यामुळे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *