लोकल सेवेच्या उद्घाटनाची उरण स्थानकात जोरदार तयारी सुरू, फुलांच्या माळांनी स्थानक सजलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उदघाटन होणाऱ्या बहुप्रतिक्षित उरण – खारकोपर लोकलच्या उदघटनाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उरण स्थानकांत हा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी स्थानकाची फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली आहे. तर रेल्वे विभागाने विविध प्रकारच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. गुरुवारपासूनच कार्यक्रमासाठी स्टेज तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्थानकातील उर्वरित कामेही सुरू आहेत.

उरणच्या नागरिकांमध्ये उत्साह

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही लोकल सेवा सुरू होत आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. शहरातील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या सोहळ्याच्या तयारी पाहण्यासाठी सकाळ पासूनच उरण रेल्वे स्थानकात येऊ लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *