तब्बल 2 वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा सब-व्हेरिएंट समोर आला असून दिवसेंदिवस या व्हेरिएंटच्या रूग्णांची नोंद होताना दिसतेय. भारतासह जगात JN.1 च्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. चीनमध्ये तर या व्हेरिएंटने हाहाकार माजल्याचं अनेक मिडीया रिपोर्ट्सनुसार समोर आलंय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 760 नव्या लोकांमध्ये संसर्गाची पुष्टी करण्यात आली आहे. 3 जानेवारीपर्यंत, JN.1 प्रकार देशातील सुमारे 12 राज्यांमध्ये पसरला असून एकूण आता या व्हेरिएंटची लागण झालेल्या लोकांची संख्या 541 वर पोहोचली आहे. देशात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या 4423 आहे.
