पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे देशात 100 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना टास्क फोर्स पुन्हा स्थापन करण्यात आला आहे. डॉ. रमण गंगाखेडकर या टास्कफोर्सचे प्रमुख असणार आहेत. कोरोनासाठी लागणारी औषध, रुग्णालय, ऑक्सिजन व्यवस्था या सगळ्यांचा टास्क फोर्स आढावा घेणार आहे. रुग्णांवर उपचार करताना समान औषधांचा प्रोटोकॉलही टास्क फोर्स निश्चित करणार आहे.
राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN 1 चे 10 रुग्ण झालेत. बुधवारी राज्यात 37 नवीन रुग्णांचं निदान झालं. तर, राज्यात दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. JN1 व्हेरियंटचे 10 रुग्ण सापडले आहेत. ठाण्यात 5, पुण्यात 3, सिंधुदुर्गात 1 तर अकोल्यात नव्या व्हेरियंटचा एक रुग्ण सापडला आहे.
