भिवंडीत अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार

तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांची कसून चौकशी केली असता, पीडित मुलीच्या सावत्र वडिलांनी मुलीची आई घरी नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात समोर आले. तसेच पीडित मुलीलादेखील पोलिसांसमोर खोटी माहिती देण्यास सांगितल्याचे समोर आले. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ जानेवारी २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

भिवंडी येथे अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी २४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. तपासा दरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने या मुलीचे तीन जणांनी अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा बनाव केला होता.

भिवंडी येथील सोनाळे गाव भागात पीडित १० वर्षीय मुलगी तिची आई आणि सावत्र वडिलांसोबत राहाते. रविवारी तिच्या कुटुंबियांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडित मुलीचे परिसरातून तीन जणांनी अपहरण केले होते. तसेच तिला एका डोंगरावर नेऊन एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला घराजवळ आणून सोडून दिले असे तक्रारीत म्हटले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडी तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *