प्रसिद्ध कॉमेडियनचे ३२ व्या वर्षी निधन, एक दिवसाआधीच साजरा केला होता वाढदिवस

एका लोकप्रिय कॉमेडियनचं अवघ्या ३२ व्या वर्षी निधन झालं आहे. नील नंदा असं या कॉमेडियनचं नाव होतं. त्याच्या निधनामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण त्याच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. निधनाच्या एका दिवसाआधीच त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. नीलचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते.

नील भारतीय वंशाचा होता, पण तो लॉस एंजेलिसमध्ये राहत होता. लहानपणापासूनच त्याना कॉमेडी करण्याची खूप आवड होती, पुढे तो कॉमेडियनच झाला. नीलचा मॅनेजर ग्रेग वाईजने त्याच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. नीलचे निधन झाल्याचे सांगताना खूप दुःख होत आहे, असं ते म्हणाले. ते मागच्या ११ वर्षांपासून नीलचे मॅनेजर होते. ग्रेग नीलला तो १९ वर्षांचा होता, तेव्हापासून ओळखायचे.

ग्रेगने नीलला एक उत्तम कॉमेडियन आणि जबरदस्त व्यक्ती म्हटलं आहे. नीलचे निधन कोणत्या कारणाने झाले, याबाबत ग्रेग किंवा नीलच्या कुटुंबियांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. नीलचे चाहते त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून श्रद्धांजली वाहत आहेत. नील जिमी किमेल लाइव्ह आणि कॉमेडी सेंट्रलच्या अॅडम डिव्हाईनच्या हाऊस पार्टीसाठी खूप लोकप्रिय होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *