मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक, 6 दिवस ‘या’ लोकल रद्द

मुंबईतील लोकल सेवा ‘लाइफलाइन’ म्हणून ओळखली जाते. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची लोकल सेवा आहे. या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. रविवारी अनेकदा लोकल आणि रुळांच्या डागडुजीकरता मेगाब्लॉक केला जातो. आज रविवार 24 डिसेंबर 2023. आज कोणत्या लाइनला मेगाब्लॉक आहे जाणून घ्या.

मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज दिवसकालीन कोणताही ब्लॉक नाही. नाताळची सुट्टी लागून आली आहे. 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा लाँग विकेंड आल्यामुळे पर्यटक मुंबईबाहेर गेलेत. पण मुंबईकरांसाठी मेगाब्लॉक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *