कारची मागची काच फोडून चोरट्यांनी वाहनातील नऊ लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार नेरुळ येथे घडला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही घटना गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा ते साडे सहाच्या दरम्यान घडली. विनोद शाही यांनी आपली कार सेक्टर चार येथील रसोई रेस्टॉरण्ट अँड बारच्या समोर उभी केली होती.
