नाताळाच्या सुट्ट्या असल्याने रविवारी मुंबईकर फिरण्यासाठी बाहेर पडणार. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रविवारी 24 डिसेंबर 2023 चं लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली भाईंदर स्थानकादरम्यान शनिवारी 23 डिसेंबर 2023 ला रात्रीचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळे पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक किती वाजता?
कुठल्या स्थानका दरम्यान – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक
किती वाजता मेगाब्लॉक – रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत
मेगाब्लॉकदरम्यान लोकलची स्थिती – सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरुन धावणार आहेत. तर ठाण्यापुढील जलद लोकल मुलुंडमधून डाऊन जलद मार्गावरुन धावण्यात येणार आहे. ठाणेमधून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. माटुंगामध्ये अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक किती वाजता?
कुठल्या स्थानका दरम्यान – पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर
किती वाजता मेगाब्लॉक – रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत
मेगाब्लॉकदरम्यान लोकलची स्थिती – सीएसएमटी – बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तर ठाणे – पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा असणार आहे. ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान आणि बेलापूर / नेरूळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान लोकल सेवा सुरु राहणार आहेत.
