बनावट पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेल्या १२३ विद्यार्थ्यांचा केंद्रीय अन्वेषण विभागाने २०२२-२३ मध्ये शोध घेतला होता. यामध्ये राज्यातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकारने याबाबत नियमात बदल केला असून चीन, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशातून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची परीक्षा देण्याची अट नाही. मात्र, अन्य देशातून पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे आवश्यक आहे. त्यांनतर त्यांना देशात वैद्यकीय व्यवसाय करता येईल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.
