एकीकडे थंडीत वाढ, तर दुसरीकडे पावसाचा अंदाज!

महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत थंडी वाढली असताना भारतीय हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे.

खात्याच्या अंदाजानुसार १५ ते १८ डिसेंबर दरम्यान तमिळनाडू, माहे आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातदेखील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळमध्येही येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी तर काही भागांत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे.दरम्यान, महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेशसह काही भागांत थंडीचा जोर वाढला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आदी ठिकाणी हिमवर्षावाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *