कल्याणमधील ज्येष्ठ गायक गिरीश जोशी यांच्या दुचाकीची चोरी

येथील ज्येष्ठ गायक गिरीश नारायण जोशी (५७) यांच्या दुचाकीची मागील दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक रस्त्यावर एका हाॅटेल समोर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. गायक जोशी यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, गायक गिरीश जोशी हे कल्याण पश्चिमेतील गुरूदेव हाॅटेल जवळील शिवाजी पथावरील एका सोसायटीत राहतात. गेल्या रविवारी रात्री त्यांनी आपली हिरो स्पेलंडर दुचाकी हाॅटेल सत्कार समोरील सार्वजनिक रस्त्यावर उभी करून ठेवली होती. या दुचाकीवर पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळेत दुचाकी चोरून नेली. तीस हजार रूपये किंमतीची ही दुचाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *