ठाणे : घोडबंदर येथील गायमुख खाडीत रविवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृताची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
गायमुख चौपाटी येथील गणेश विसर्जन घाटाजवळ कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह स्थानिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आढळून आला. त्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्याचे पथक, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खाडीतून मृतदेह बाहेर काढला. अंदाजे ५५ वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
