जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ११ ते १४ डिसेंबर दरम्यान जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का पर्यंत जाणार आहे अशी माहिती जेएनपीटी वाहतूक विभागाने दिली आहे.
नौदलाच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामुळे जल वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे.पावसाळ्यातील चार महीने भाऊचा धक्का( फेरी वार्फ जेट्टी) पर्यंत जाते. मात्र त्यानंतर ही सेवा गेट वे पर्यंत सुरू करण्यात येते. या संदर्भात जेएनपीटीच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक प्रसिद्धी केले आहे.
