माझ्या मित्राला संपवून टाक! मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा; पुण्यातील खळबळजनक प्रकार

 सुसंस्कृत पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा जादूटोण्याचा (Black Magic) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखून 18 लाख रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. मित्राच्या मृत्यूसाठी एका व्यक्तीने स्मशानभूमीत जाऊन पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्याजवळ असलेल्या सुरतापवाडी गावातील स्मशानभूमीत या अघोरी पूजेने गावकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. व्यावसायिक वादातून मित्राचा मृत्यू होण्यासाठी पुण्यातील सोरतापवाडीजवळ स्मशानभूमीत गणेश तात्यासाहेब चौधरी याने अघोरी पूजा घातली आहे. गणेश चौधरी हा अवैध सावकार आहे. पुण्याजवळील सोरतापवाडीमध्ये राहणाऱ्या त्याचा मित्र अमोल मानमोडे याचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा म्हणून चौधरीने घातली स्मशानभूमीत अघोरी पूजा घातली होती. गावताल्या लोकांना हा सगळा प्रकार समजताच त्यांना जबर धक्का बसला. त्यानंतर गणेश चौधरी याच्या विरोधात पुण्यातील लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, चौधरी हा रात्री अपरात्री सोरतापवाडीच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन वेगवेगळ्या अघोरी पूजा घालत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *