दहिसरमध्ये जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी

दहिसर येथील हरेम टेक्स्टाईलसमोर टोल नाक्याजवळ मंगळवारी सकाळी ३०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. यामुळे टोलनाका परिसरात पाणी साचले असून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतर्फे देखभालीचे काम सुरू असताना ही घटना घडली. मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदत क्रमांकावरून घटनेची माहिती मिळताच जलअभियंता विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुपारी ४ वाजेपर्यंत जलवाहिनीचे दुरुस्तीकाम पूर्ण होईल, असे महनगरपलिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *